जीएसटी करदाता रेटिंग पद्धती केरळ मध्ये सुरू- ही पद्धत सुरू करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य

GST 4 YOU



जीएसटी करदात्याचे अनुपालन रेटिंग हे भारतातील वस्तू आणि सेवा कर (GST) प्रणालीद्वारे जीएसटी कायदे आणि नियमांचे पालन करणाऱ्याचे मूल्यांकन करण्यासाठी केलेले गुणांकन असून हे रेटिंग विविध घटकांवर आधारित आहे जसे की:
1. जीएसटी रिटर्न वेळेवर भरणे (GSTR-1, GSTR-3B, इ.)
2. वेळेवर कर भरणे
3. भरलेल्या कर तपशीलांची अचूकता
4. इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चे योग्य सामंजस्य
5. जीएसटी नियम आणि नियमांचे पालन
 या पद्धतीमुळे करदात्यास त्याचा पुररठादार किंवा ग्राहक हा जीएसटी अनुपालन कशा पद्धतीने करत आहे व तो जेन्यूईन आहे का नाही हे ठरवून त्याच्याशी व्यवहार करणे सोपे जाणार आहे. आयटीसी फ्रॉड च्या केसेस मध्ये अशा पद्धतीच्या रेटिंग चा मोठा फायदा करदात्यांना व  विभागास होणार आहे.
करदात्याचे अनुपालन रेटिंग