रू. ४.६९ कोटींच्या जीएसटी परतावा घोटाळ्यात, राज्य जीएसटी अधिकाराच्याविरुद्ध गुन्हा

GST 4 YOU
जीएसटी परतावा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात, राज्य  विभागाने गजानन लाड या राज्य जीएसटी अधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गजानन लाड या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत सरकारी पदाचा गैरवापर करून अस्तित्वात नसलेल्या कंपनीला ४.६९ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी परतावा दिला.गेल्या वर्षीच, जीएसटी विभागाने त्यांचेच अधिकारी अमित लाळगे यांच्याशी संबंधित १७५ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा घोटाळा उघडकीस आणला होता.
 बुधवारी, कर विभागाच्या तक्रारीवरून, एसीबीने घाटकोपर विभागात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जीएसटी अधिकारी गजानन लाड यांच्याविरुद्ध हा नवीन गुन्हा दाखल केला. बनावट कागदपत्रांचा वापर करून जीएसटी नोंदणी मिळविणाऱ्या मेसर्स इंटरकिब मार्केट (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कर परतावा मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे 
   अधिकाऱ्यांनी सांगितले की कंपनीने कोणताही कर भरला नसला तरी, योग्य पडताळणी न करता परतावा अर्ज सादर करण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. लाड वर कंपनीशी संगनमत करून,  निर्धारित जीएसटी परतावा प्रक्रिया टाळून, कर परतावा सुलभ करण्यासाठी बनावट अहवाल तयार केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 
सूत्रानुसार लाड यांनी अधिकृत पदाचा स्पष्टपणे गैरवापर केला आहे. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा परतावा मंजूर  करण्याचा अधिकार त्यांना नसताना त्यांनी  कायदेशीर पद्धतीचे उल्लंघन केले आहे. सुत्रांनी पुढे  सांगितले की लाडची कार्यपद्धती अमित लालगे सारखीच आहे, ज्याने १७५ रुपयांच्या जीएसटी परतफेडीचा दावा करण्यासाठी १६ कंपन्यांचे निर्यात दस्तऐवज फसवणूकीने सादर केले.