जीएसटी कायद्याच्या कलम १६(४) संदर्भात नव्याने समाविष्ट केलेल्या कलम १६(५) आणि १६(६) नुसार आयटीसीचा दावा करण्यासाठी दुरुस्ती दाखल करण्याची शेवटची तारीख आज ०७.०४.२०२५ आहे, जी सीबीआयसी परिपत्रक क्र. २३७/ ३१/ २०२४-जीएसटी दिनांक १५.१०.२०२४ च्या परिच्छेद ५ मध्ये स्पष्ट केली आहे.
सीजीएसटी कायद्याच्या कलम १६ (४) मध्ये काही विशिष्ट मागील आर्थिक वर्षांच्या संदर्भात आयटीसी मिळण्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी उप कलम (५) आणि (६) अशी दोन नवीन उप कलमे समाविष्ट केली आहेत. ही कलमे आयटीसी दावा दुरुस्तीसाठी प्रक्रियाद्वारा करदात्यांना पूर्वलक्षी सवलत देण्यासाठी कायद्यात समाविष्ट केली आहेत.
सदर सीबीआयसी परिपत्रका च्या परिच्छेद ५ नुसार, CGST कायद्याच्या कलम ७३, ७४, १०७ किंवा १०८ अंतर्गत जारी केलेल्या आदेशासाठी दुरुस्ती अर्ज दिनांक ०८.१०.२०२४ च्या अधिसूचना क्रमांक २२/२०२४ - केंद्रीय कर मध्ये अधिसूचित केलेल्या विशेष प्रक्रियेअंतर्गत दाखल केला जाऊ शकतो.
हे फक्त जेव्हा पुष्टी केलेल्या मागणीमध्ये CGST कायद्याच्या कलम १६(४) चे उल्लंघन झाल्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा चुकीचा वापर झाला होता आणि आता असा ITC आता कलम १६(५) किंवा १६(६) अंतर्गत उपलब्ध आहे यासाठीच असून या साठी अधिसूचनेच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
म्हणून, नव्याने समाविष्ट केलेल्या कलम १६(५) आणि (६) नुसार आयटीसीचा दावा करण्यासाठी दुरुस्ती दाखल करण्याची शेवटची तारीख आज ७.४.२०२५ आहे, हे विसरू नका.