53 मिनिटात जीएसटी नोंदणीला मंजुरी- चार्टर्ड अकाउंटंट यांनी केला अनुभव शेअर- नवीन नोंदणी प्रक्रिया 1 नोव्हेंबर पासून सुरू

GST 4 YOU
                सरकारने अलीकडेच जीएसटी नोंदणीला गती देण्यासाठी नवीन उपक्रमांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये नवीन ३-दिवसांच्या आत नोंदणी या उपक्रमाच्या समावेश आहे. या पार्श्वभूमीवर एका तासात जीएसटी मंजुरी मिळाल्याची माहिती एका चार्टर्ड अकाउंटंटनी एक्स पोस्ट द्वारे सार्वजनिक केली आहे.  1 नोव्हेंबर ला जीएसटी नोंदणीची नवीन पद्धती सुरू झाल्या नंतर एका तासापेक्षा कमी वेळात जीएसटी नोंदणीला मंजुरी देण्यात आली. सरकारच्या डिजिटल सुधारणांचा आणि व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे.
           एक चार्टर्ड अकाउंटंट यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याप्रमाणे, त्यांनी जीएसटी नोंदणी प्रक्रिया दुपारी १:४२ वाजता सुरू केली, आधार प्रमाणीकरण दुपारी १:५८ वाजता पूर्ण झाले आणि जीएसटी क्रमांक मंजुरी दुपारी २:३५ वाजता मिळाली, संपूर्ण प्रक्रिया फक्त ५३ मिनिटांत पूर्ण झाली.
           केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटी यांच्या सुधारित जीएसटी इंटरफेस आणि स्वयंचलित पडताळणी प्रक्रियांचा सकारात्मक परिणाम या तत्काळ मंजुरीवरून दिसून येतो. यामुळे जीएसटी परिषदेने डिजिटल नवकल्पनांचा वापर करून 'वेळेत प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी' सुरू असलेले प्रयत्न यांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले आहे.