राज्य कर (जीएसटी) विभागाची संघटनात्मक पुनर्रचना -नवीन 13 लेखा परीक्षण (Audit) शाखां सह 5 नवीन परीक्षेत्रीय (Zonal) कार्यालये,14 नवीन नोडल (Nodal) विभाग तर 3 नव्या अन्वेषण (Investigation) शाखा यांची निर्मिती

GST 4 YOU

वस्तू व सेवाकर विभागाची पुनर्रचना व सुधारीत आकृतीबंधाच्या प्रस्तावास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समीतीने मंजूरी दिल्या नंतर दिनांक 11.03.2024 रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार राज्य वस्तू व सेवा कर विभागाची पुनर्रचना व सुधारीत आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.
राज्य वस्तू व सेवाकर विभागाची पुनर्रचना व सुधारीत आकृतीबंध करण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.
वस्तु व सेवा कर विभागातील नवीन शाखा व विविध शाखांमधील वाढ
1) लेखा परीक्षण शाखा – संपूर्ण राज्यात प्रत्येक परीक्षेत्रात (Zone) एक या प्रमाणे 13 परीक्षेत्रात एकूण 13 लेखा परीक्षण विभाग (Division) निर्माण करण्यात येत आहेत. आर्थिक बुध्दी संपदा कक्षा ने करदात्यांमधून पात्रता निकषांच्या आधारे निवडलेली प्रकरणे या 13 लेखा परीक्षण विभागाकडे सोपविण्यात येतील.
2) पर्यवेक्षी पुनर्रचना - नवीन परीक्षेत्र (Zonal) व नोडल विभाग तसेच आस्तित्वात असलेल्या परीक्षेत्राची व नोडल विभागाची पुनर्रचना
क) परीक्षेत्र पुनर्रचना - प्रशासकीय सुलभता व प्रभावी नियंत्रणाकरीता पर्यवेक्षी पुनर्रचना करण्यात येत असून सध्या असलेल्या 8 परीक्षेत्रासह 5 नवीन परीक्षेत्रीय कायालये (मुंबई येथे 2 व पुणे, औरंगाबाद व रायगड येथे प्रत्येकी 1) निर्माण करण्यात येत आहेत. त्यानुसार खालीलप्रमाणे एकूण 13 परीक्षेत्रीय कायालये राहतील.
ख) मोठे करदाते कक्षाचे विलीनीकरण - नोडल विभागांच्या पुनररचनेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील (मुंबई -4, पुणे-2) 6 मोठे करदाते कक्ष बंद करण्यात येत आहेत.
ग) नोडल विभाग - सध्या 28 नोडल विभाग असून 14 नवीन नोडल विभाग निर्माण करण्यात येत आहेत. त्यानुसार एकूण 42 नोडल विभाग राहतील. एकूण 42 नोडल विभागांपैकी 02 नोडल विभागांचा कायरभार सह आयुक्त (अन्वेषण) (भा.प्र.से.) या अधिकाऱ्यांकडे राहील.
3) अन्वेषण शाखा- पर्यवेक्षीय पुनर्रचनेच्या अनुषंगाने ठाणे येथे 01, पुण्यातील नवीन परीक्षेत्रासाठी 01 व रायगड परीक्षेत्रां अंतर्गत कल्याण येथे 01 अन्वेषण शाखा निर्माण करण्यात येत आहे. या तीन शाखांसाठी 06 राज्यकर उपायुक्तांची व 18 राज्यकर सहायक आयुक्तांची नवीन पदे निर्माण करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पदसंख्या पुढील प्रमाणे राहील:-
प्रशासकीय सोईसाठी मंजूर केलेल्या वाढीव पदसंख्येमध्ये पुणे-1 व पुणे-2 या विभागा करता एका सह आयुक्त (अन्वेषण) (भा.प्र.से.) ची आवश्यकता असल्याने, औरंगाबाद येथील सह आयुक्त (भा.प्र.से.) हे संवर्ग पद पुणे येथे स्थानांतरीत करण्यात येत आहे. पुणे -१ व पुणे-2 हे अन्वेषण विभाग एकत्रित करुन त्याचा कार्यभार सहआयुक्त (अन्वेषण) (भा.प्र.से.), पुणे यांचेकडे ठेवण्यात येत आहे. सह आयुक्त (अन्वेषण) (भा.प्र.से), पुणे यांचेकडे वरीलप्रमाणे अन्वेषण या कार्यभारा व्यतिरीक्त पुणे येथील एका नोडल विभागाचा कार्यभार कायमस्वरुपी राहील. ठाणे शहर व ग्रामीण विभागां करीता मोठया प्रमाणावर उपायुक्त/ सहायक आयुक्त (अन्वेषण) नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत. सदर विभागांकवरता एका सह आयुक्त (अन्वेषण) (भा.प्र.से.) ची आवश्यकता असल्याने, सह आयुक्त (सर्व्हे.) (भा.प्र.से.) मुंबई या पदाचे सहआयुक्त (अन्वेषण), (भा.प्र.से.) ठाणे असे पुर्ननामकरण करण्यात येत आहे. ठाणे शहर व ग्रामीण हे अन्वेषण विभाग एकत्र करुन त्याचा कार्यभार सहआयुक्त (अन्वेषण), (भा.प्र.से.) ठाणे यांचेकडे ठेवण्यात येत आहे. सह आयुक्त (अन्वेषण) (भा.प्र.से), ठाणे यांचेकडे वरीलप्रमाणे अन्वेषण या कार्यभारा व्यतिरीक्त ठाणे/ मुंबई येथील एका नोडल विभागाचा कायरभार कायमस्वरुपी राहील.
4) अपील शाखा - अपील प्रकरणांच्या जलद निपटाऱयासाठी परीक्षेत्रीय (Zonal) स्तरावर प्रत्येकी दोन या प्रमाणे 26 अपील राज्यकर सह आयुक्तांची पदे व नोडल विभाग स्तरावर प्रत्येकी 01 याप्रमाणे 42 राज्यकर उपायुक्तांची पदे निर्माण करण्यात येत आहेत.
या शिवाय अनेक महत्वाचे बदल या शासन निर्णयानुसार प्रस्तावित असुन सदर शासन निर्णय दि.15.03.2024 हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक सांकेतांक 202403151928452505 असा आहे. तपशीलवार आधिक माहितीसाठी त्याचा संदर्भ संबंधितानी घ्यावा.