आधार प्रमाणीकरण होऊन ही जीएसटी नोंदणीला उशीर होत असल्याच्या तक्रारींबद्दल जीएसटी नेटवर्कचा खुलासा

GST 4 YOU

जीएसटी 
नियम, 2017 च्या नियम 8 आणि 9 नुसार यशस्वी आधार प्रमाणीकरण होऊन ही  जीएसटी नोंदणीला उशीर होत  असल्याच्या तक्रारी काही करदात्यांकडून  जीएसटी नेटवर्क कडे प्राप्त होत  असल्याच्या पार्श्वभूमीवर जीएसटीएन ने याबाबत खुलासा जारी केला आहे.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) नियम, 2017 च्या नियम 9 नुसार, नोंदणी अर्जांची पडताळणी आणि मंजूरी करिता
जर एखाद्या व्यक्तीचे नियम 8 च्या उप-नियम (4A) नुसार आधार प्रमाणीकरण केले असेल परंतु जोखीम मानके यावर आधारित तपशीलवार पडताळणीसाठी सामान्य पोर्टलद्वारे नियम 9(aa) नुसार जर सदर व्यक्ती निवडली  गेली असेल, तेव्हा नोंदणीसाठी   अर्ज सादर केल्या च्या तीस दिवसात  नोंदणी प्रक्रिया केली जाईल. 
नोंदणी अर्जाच्या प्रक्रियेच्या ऑनलाइन ट्रॅकिंग मॉड्यूलमध्ये त्या संबंधित आवश्यक ये बदल देखील केले जात आहेत.