सोमवारी (दि.९) रोजीच्या जीएसटी परिषदेच्या ५४ बैठकीत जीएसटी कायदा , २०१७ मधील कलम ७३ खालील प्रकरणात ३१ मार्च २०२५ पर्यंत कर भरणा केल्यास व्याज व दंड माफी साठीची अभय योजनेची १ नोव्हेंबर २४ पासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
जीएसटी कायदा,२०१७ कलम ७३ अंतर्गत आर्थिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९ आणि २०२९-२० या आर्थिक वर्षासाठी कर मागण्या संबंधीत व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची प्रक्रिया आणि त्यातील अटी करिता जीएसटी कायद्या तील नवीन कलम १२८A नुसार जीएसटी परिषदेने जीएसटी नियम, २०१७ मध्ये नवीन नियम १६४ समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.
या अभय योजने चा लाभ घेण्यासाठी फॉर्म, प्रक्रिया पद्धती आणि अटी शर्ती यांचा तपशील अद्याप जाहीर झाला नाही. सदर योजनेचा लाभ घेण्या संबंधित विविध समस्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी परिपत्रक जारी करण्याची शिफारसही परिषदेने केली आहे.