21 कोटींचा जीएसटी घोटाळा डीजीजीआय ने केला उघड-औषध दुकान साखळी कंपनीच्या कर व्यवस्थापकाला केली कोल्हापूरात अटक

GST 4 YOU
       21 कोटींचा जीएसटी घोटाळा कोल्हापूर केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचलनालय (डीजीजीआय) च्या पथकाकडून ने उघड केला असून प्रख्यात औषध दुकानांच्या साखळी कंपनीच्या कंपनीच्या कर व्यवस्थापकाला कोल्हापूर येथे अटक करण्यात आली आहे. 
         मुंबईतील औषध दुकानांच्या साखळी समूहाच्या करप्रणाली व्यवस्थापक मयांक मुकेश पटेल, रा. डोंबिवली पश्चिम, याला  २१ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अटक केली. कोल्हापूर  येथे मा. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली.  
       या संबंधीची गुप्त माहिती  मिळाल्याने अधिकाऱ्यांनी  छाननी केली असता कर चुकवेगिरी झाल्याचे  स्पष्ट झाल्यानंतर गुप्तचर अधिकाऱ्यांनी पटेल यांना नोटीस देऊन चौकशीसाठी कोल्हापूरला बोलावले होते. मंगळवारी त्याची अधिक चौकशी करून अटकेची कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांचा सहभाग असावा, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
        हेल्थटेक कंपनीत मयांक पटेल हा  करप्रणाली व्यवस्थापक पदावर काम करीत होता . या कंपनी कडून करचुकवेगिरी झाल्याची माहिती विशेष गुप्तचर पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर कार्यालयातील पथकाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी विक्रोळी येथे छापा टाकून कंपनीच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये करप्रणाली व्यवस्थापकाने  कंपनीच्या कागदपत्रांद्वारे बनावट खरेदी-विक्री केल्याचे दाखवून आठ कोटी रुपये कर चुकवल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांने  स्वतःची एक कंपनी कागदोपत्री सुरू केली होती. त्या कंपनीकडून १३ कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याचे तपासणीत समोर आले होते. 
         केंद्रीय जीएसटी विभागातील वरिष्ठ गुप्तचर अधिकारी सूरज पवार, अभिजित भिसे, सौरभ पवार यांच्यासह अमितकुमार जयस्वाल, अविनाश सूर्यवंशी आणि हिमांशू आहुजा यांच्या पथकाने ही कारवाई केली.