आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण वार्षिक उलाढाल ₹५ कोटींपर्यंत असलेल्या जीएसटी लहान करदात्यांनी "या" योजनेचा फायदा घेतला का?

GST 4 YOU
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण वार्षिक उलाढाल ₹५ कोटींपर्यंत असलेल्या लहान करदात्यांसाठी व्यवसाय सुलभतेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असून तिमाही विवरणपत्र मासिक कर भरणा (क्यूआरएमपी)  योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे पात्र करदाते जीएसटी पोर्टल (www.gst.gov.in) वर जाऊन  त्यात सामील होऊ शकतात
या साठी करदात्यांनी  लॉग इन करावे..
सेवा > विवरणपत्र > तिमाही विवरणपत्र पर्यायासाठी निवड करा वर जा. क्यूआरएमपी योजनेचा लाभ घेणाऱ्या करदात्यांना योजनेसाठी प्रत्येक वर्षी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
फायदे
*तिमाहीतून फक्त एकदाच फॉर्म जीएसटीआर-१ आणि जीएसटीआर-३बी मध्ये जीएसटी स्टेटमेंट/विवरणपत्र दाखल करा.
*योजनेची सहजपणे निवड करा किंवा त्यातून बाहेर पडा 
*तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांत निश्चित रक्कम पद्धत (पूर्व-भरलेले चलन) किंवा स्व-मूल्यांकन पद्धत (आयटीसी समायोजित केल्यानंतर देय प्रत्यक्ष कर) वापरून सोयीस्कर पद्धतीने मासिक कर भरा.
*फ्लेक्सिबल इनव्हॉइस फर्निशिंग फॅसिलिटी (आयएफएफ) च्या सुविधेचा लाभ घ्या.
*प्रत्येक तिमाहीत एकदा आयटीसी आणि कराचे स्व-मूल्यांकन

*आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीपासून क्यूआरएमपी योजनेची निवड करण्याची शेवटची तारीख  ३० एप्रिल २०२५ आहे.
*पात्र नोंदणीकृत व्यक्ती मागील तिमाहीच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तिमाहीच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणत्याही तिमाहीसाठी पर्याय वापरू शकते.
*अधिक माहितीसाठी कृपया अधिसूचना क्र. ८१ ते ८५/२०२०-केंद्रीय कर आणि परिपत्रक क्र. १४३/ १३/ २०२०-जीएसटी, सर्व दिनांक १०.११.२०२० पहा.
जीएसटी विवरण पत्र फाइलिंगः ते जलद, सोपे आणि सुलभ आहे. असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ यांनी घोषित केले आहे.