आयकर विभागाने कर दात्याना विवरण पत्र भरताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला असून चुकीच्या वजावटी व सवलती न घेता अचूक तपशिल देण्यास सांगितले आहे.
भरलेले घरभाडे, गृहकर्जावरील व्याज व मुळ रककम, शैक्षणिक कर्जावरील व्याज, स्वतः साठी किंवा कुटुंबीयांसाठी भरलेला आरोग्य विम्याचा हप्ता, दिव्यांग व्यक्तीसाठी वजावट तसेच धर्मादाय संस्था,ट्रस्ट व राजकीय पक्ष यांना दिलेल्या देणग्या यांचा तपशील भरताना अचुक माहिती देण्या बद्दल सुचवले आहे.
कोणत्याही वजावटीचा, सवलतीचा दावा करण्यापूर्वी आपले आयकर विवरण पत्र ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्व वजावटी या सत्य व वास्तविक असणे आवश्यक आहेत.प्रत्यक्ष भरणा आणि कागदपत्राद्वारे त्या समर्थित आहेत व उत्पन्नाची कोणतीही चुकीची माहिती दिली जात नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
याबाबत काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी असेसमेंट वर्ष 2023 -24 साठी सुधारित आयकर विवरण पत्र तर 2021-22 व 2022-23 साठी अद्ययावत विवरण पत्र कर दाते सादर करू शकतात.
मात्र उत्पन्नाचा चुकीचा दाखला दिल्यास आयकर कायदा, 1961 नुसार दंड व गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.