जीएसटी विभागाचे वाहनांच्या सुट्या भागांच्या विक्रेत्यांवर छापे- करचुकवेगिरी उघड

GST 4 YOUजीएसटी विभागाचे वाहनांच्या सुट्या भागांच्या विक्रेत्यांवर छापे-  मोठी करचुकवेगिरी उघड 

  ऑटोमोबाईल क्षेत्रातील करचुकवेगिरी उघड होत असून , वस्तू आणि सेवा कर  विभागाने मागील काही दिवसात गुजरातमधील चार प्रमुख शहरांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले.

  कर विभागाने राज्यभरातील कार अक्सेसरीज आणि वाहनाच्या  सुट्या भागांच्या 46 डीलर्सच्या सुमारे 72 ठिकाणी विस्तृत तपासणी तून  रू 6 कोटींची करचोरी उघडकीस आणली आणि व्यापाऱ्यांकडून रू 1.50 कोटी वसूल केले.

जीएसटी अधिकार्‍यांच्या वेगवेगळ्या पथकांनी अहमदाबादमधील 35, सुरतमधील 12 आणि वडोदरामधील 12 ऑटो पार्ट्स आणि अक्सेसरीज डीलर्सवर छापे टाकले. 
ऑटो पार्ट्स निर्मितीचे केंद्र असलेल्या राजकोटमधील 13 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले

स्टॉक आणि अकाउंटिंग कागदपत्र तपासणी दरम्यान, अनेक ठिकाणी, व्यापाऱ्यांनी हिशेब न ठेवता मालाची वारंवार खरेदी-विक्री केली.
मालाचे चुकीचे वर्गीकरण करून कमी दराने कर भरण्यात आल्याचेही विभागाच्या निदर्शनास आले आहे. कंपोझिशन स्कीम मध्ये आसतानाही व्यापारी ग्राहकांकडून स्वतंत्रपणे कर वसूल करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

शिवाय, 76 ठिकाणी  ऑटो पार्ट्स विक्रेते नोंदणीशिवाय व्यवसाय करत असल्याचे उघड झाले.