जीएसटी न भरल्यास शंभर टक्के दंड आकारणीचे कलम केव्हा लागू होते... सरकार चे निर्देश..

GST 4 YOU

जीएसटी न भरल्यास शंभर टक्के दंड आकारणीचे कलम केव्हा लागू होते... सरकार चे निर्देश..


जीएसटी न भरल्यास शंभर टक्के दंड आकारणी तसेच कारणे दाखवा सूचना जारी करण्याची सामान्य असलेली तीन वर्षांची मुदत ही पाच वर्षे लागू करण्यासाठी चे जीएसटी कायदा,2017 कलम 74 केव्हा लागू होते या बाबत सरकार ने निर्देश जारी केले आहेत.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ , नवी दिल्ली यानी इंस्ट्रक्शन्स क्र. 5/ 2023-GST दि.13.12.2023 नुसार जीएसटी कायद्यातील कलम 74 बद्दल निर्देश जाहीर केले आहेत.

या नुसार जीएसटी कायद्याच्या कलम 74 (1) च्या शब्दांच्या अभ्यासावरून, हे स्पष्ट होते की कलम 74 (1) फक्त अशा प्रकरणांमध्ये लागू केले जाऊ शकते जेथे करदात्याने फसवणूक किंवा जाणून बुजून चुकीची माहिती देऊन किंवा तथ्य दडवून कर बुडविला आहे.

हे कलम 74 (1, फसवणुकीच्या विशिष्ट घटका शिवाय किंवा जाणूनबुजून चुकीची माहिती न देता किंवा तथ्य दडवल्या शिवाय कर भरला नाही तर लागू केले जाऊ शकत नाही.

म्हणूनच, ज्या प्रकरणांमध्ये तपासात असे स्पष्ट झाले की फसवणूक किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन करदात्याकडून कर चुकवण्यासाठी वस्तुस्थिती दडवल्याचा पुरावा आहे, अशा प्रकरणांमध्ये सदर कायद्याच्या कलम 74 (1) च्या तरतुदी लागू केल्या जाऊ शकतात. तसेच कारणे दाखवा नोटीसा देताना त्यामध्ये अशा गोष्टींचा पुरावे देणे गरजेचे आहे.
अशा प्रकरणांची चौकशी करताना आणि कारणे दाखवा नोटीस बजावताना वरील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
सदर इंस्ट्रक्शन्स क्र. 5/2023- दि. 13 .12.2023 याची लिंक खाली दिली आहे.
https://taxinformation.cbic.gov. in/view-pdf/1000492/ENG/ Instructions