जीएसटी इन्वेस्टीगेशन संदर्भात व्यवसाय सुलभीकरणाच्या अनुषंगाने सीबीआयसी कडून अधीनस्थ कार्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना निर्देश जारी

GST 4 YOU

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, नवी दिल्ली (सीबीआयसी) यांनी दिनांक 30 मार्च 2024 च्या निर्देश क्रमांक 01 /2023-24-GST (Inv.) द्वारे नियमित करदात्यांच्या इन्वेस्टीगेशन संदर्भात व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी मंडळाच्या अधीनस्थ केंद्रीय जीएसटी कार्यालयासाठी अतिशय महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
   इन्वेस्टीगेशन करण्याच्या क्रियाकलापांच्या एकसमान प्रक्रियेचे पालन करण्यासंदर्भात अधीनस्थ केंद्रीय जीएसटी कार्यालयासाठी निर्देशित विविध बाबी मध्ये व्यवसाय सुलभतेच्या पैलूंचा समावेश करण्यात आला आहे.
       संबंधित बाबी लक्षात घेऊन, यापुढे कायदेशीर तरतुदी किंवा या संदर्भात जारी केलेल्या सूचनांच्या अधीन राहून, तपासात गुंतलेल्या अधीनस्थ केंद्रीय जीएसटी कार्यालयानी सदर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे अशी बोर्डाची सूचना आहे.
        सदर सूचना येथे पाहता येईल.👇