चार्टर्ड अकाउंटंट ची कागदपत्रे वापरून बोगस नोंदणी - १५ कोटींचा जीएसटी घोटाळा उघड
August 07, 2025
चार्टर्ड अकाउंटंट ची कागदपत्रे वापरून १५ कोटींचा जीएसटी घोटाळा प्रकरणात दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी शशीकांत गुप्ता विरुद्ध आरोप पत्र सादर केले .शशीकांत गुप्ता यांने त्याचा फरार मुलगा अक्षय गुप्ता याच्यासोबत मिळून "मधु एंटरप्रायझेस" यासह इतर बनावट कंपन्यांसाठी जीएसटी नोंदणी प्रमाणपत्रे बोगस पद्धतीने मिळविण्यासाठी गुन्हेगारी कट रचून भाडे करार, भागीदारी करार आणि वीज बिल यासारख्या बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी जीएसटी नोंदणी करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटचे पॅन कार्ड आणि छायाचित्र वापरले. त्यांनी अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाने बँक खाती उघडली आणि १४.८ कोटींपेक्षा जास्त बनावट व्यवहार केले. या प्रकरणात सीएच्या ओळखीचा आणि डिजिटल क्रेडेन्शियल्सचा थेट गैरवापर होऊन आर्थिक आणि सायबर कायद्यांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे दिसून आले.