साताऱ्यातील कराडच्या पाचपुतेवाडीत पुणे केंद्रीय महसूल गुप्तचर विभाग (DRI) कडून छापेमारी, हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त केल्याची चर्चा
January 25, 2026
. साताऱ्यातील कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या केंद्रीय महसूल गुप्तचर विभाग (DRI) विभागानं मोठी कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे. ही कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आल्यानं ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात महिन्यात दुसरी कारवाई झाली आहे. डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग्ज जप्त केलं होतं. डीआरआय विभागानं केलेल्या या कारवाईबाबत अधिकृत माहिती अजून मिळाली नसून त्यामुळे नक्की या ठिकाणी कोणतं अंमली पदार्थ तयार केला जात होतं , किती जणांना ताब्यात घेण्यात आले किंवा काय याची माहिती समोर येऊ शकली नाही.