रु. ८.५० कोटींचा जीएसटी घोटाळा उघड; केंद्रीय जीएसटी गुप्तचर शाखेकडून कोल्हापुरात एकास अटक

GST 4 YOU
       सुमारे ५० कोटींची खोटी बिले सादर करून ८ कोटींची जीएसटी घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कोल्हापूर येथील केंद्रीय जीएसटी गुप्तचर पथकाने गोवा येथील व्यापारी आर्थिक ललितकुमार जैन (२९, रा. वास्को, दक्षिण गोवा) यास शुक्रवारी अटक केली. 
           कोल्हापूर येथील केंद्रीय जीएसटी गुप्तचर महा संचालनालय ,कोल्हापूर शाखेचे  वरिष्ठ  गुप्तचर अधिकारी सुरज पवार, अभिजित भिसे, गुप्तचर अधिकारी  सौरभ पवार, अविनाश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
       १८ ऑक्टोबर रोजी पथकाने गोव्यातील मे. आर्थिक ललितकुमार जैन व  त्याच्या आणि एका फर्मच्या कार्यालय व घरावर छापा टाकला होता. अधिकाऱ्यांनी संशयित जैन यांच्या वापरातील मोबाईलसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. जप्त मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीदरम्यान जैन यांनी केलेल्या व्यवहारात संशयास्पद नोंदी आढळून आल्या. या अनुषंगाने केलेल्या तपासणीत सुमारे त्याने सुमारे ५० कोटींची खोटी बिले सादर केल्याचे निदर्शनास आले होते. 
      जैन याने त्याच्या आईच्या नावे असलेल्या गोव्यातील दुसऱ्या फर्मवरही कर चोरीचा प्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. गुप्तचर विभागाने याप्रकरणी संशयित जैन यास अटक करून त्याच्याकडे चौकशी केली. शुक्रवारी दुपारी त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता १४ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.