केंद्रीय जीएसटी ने तयार कपड्यांच्या 10 व्यापाऱ्यांकडून रू.1.25 कोटी जीएसटी ची रक्कम केली वसूल... इंदूर येथे कारवाई

GST 4 YOU
       
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने (CGST) इंदूर शहरातील 10 तयार कपड्यांच्या व्यापाऱ्यांकडून 1.25 कोटी रुपयांची जीएसटी ची रक्कम वसूल केली आहे. व्यापाऱ्यांनी केवळ साध्या स्लिपवरच कपड्यांचा पुरवठा  केला होता आणि 5%  जीएसटी भरण्यास टाळाटाळ केली होती. 
     केंद्रीय जीएसटी पथकाने गुरुवारी रेडिमेड कपड्यांच्या 10 व्यापाऱ्यांच्या दुकानांची झडती घेतली. या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात साठा तसेच संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की कोलकात्यासह देशाच्या अनेक भागांतून रेडिमेड कपडे शहरात येतात, व काही घाऊक व्यापाऱ्यांद्वारे ते बिल न देता विकले जातात.
     त्यामुळे सीजीएसटी विभागाच्या कर चोरी प्रतिबंधक पथकाने  सदर आस्थापनांवर कारवाई केली. जीएसटी चोरीची १.२५ कोटी रुपयांची वसुली त्यांच्या कडून करण्यात आली आहे.