केंद्रीय जीएसटी व सीमा शुल्क विभागाच्या देशातील सर्वात मोठ्या कार्यालयीन व निवासी संकुलाची हैदराबाद येथे पायाभरणी-अधिकार्यांसाठी योग्य कामाची जागा आणि व्यापार सुलभतेसाठी आधुनिक वातावरण निर्मिती साठी आवश्यक पायाभूत सुविधा

GST 4 YOU


केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागांतर्गत हैदराबाद येथे देशातील सर्वात मोठ्या कार्यालयीन व निवासी संकुलाची पायाभरणी केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ, नवी दिल्ली चे सदस्य (प्रशा.) आलोक शुक्ला ,झोनल सदस्य विवेक रंजन, महासंचालक (एचआरडी), हैदराबाद झोन चे मुख्य आयुक्त संदीप प्रकाश, आणि इतर वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय जीएसटी, हैदराबादचे प्रधान आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
या प्रसंगी बोलताना महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, आजचा पायाभरणी कार्यक्रम हा सरकारच्या विशेषत: माननीय केंद्रीय अर्थमंत्री यांच्या जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कामाचे आरामदायक वातावरण प्रदान करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग आहे. महसूल सचिवांनी असे प्रकल्प हाती घेतल्याबद्दल सीबीआयसीचे कौतुक केले ज्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य कामाची जागा आणि निवासी सुविधा याशिवाय व्यापार सुलभतेसाठी आधुनिक वातावरण निर्माण होईल असे मत मांडले. पायाभूत सुविधांचे प्रकल्प योग्य प्रकारे हाती घेतल्याबद्दल त्यांनी हैदराबाद झोनचे कौतुक केले आणि इमारतीच्या कामांना गती देण्याची विनंती केली जेणेकरून अत्याधुनिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध होतील.
या प्रस्तावित नवीन जीएसटी भवन मध्ये ऑफिस टॉवर हा 2 बेसमेंट, 4 ओव्हर ग्राउंड पार्किंग आणि 21 ऑफिस मजले असे सुमारे 77000 चौरस मीटरचे बिल्ट-अप क्षेत्र व्यापेल. हैदराबादच्या हाय टेक सिटी जवळील नवीन जीएसटी भवनमध्ये हैदराबादची बहुतेक सीजीएसटी कार्यालये असतील. निवासी टॉवरमध्ये अंदाजे 7900 चौरस मीटर बिल्ट-अप क्षेत्रासह 21 अपार्टमेंट्स असतील. या सर्वा साठी अंदाजे रु. 645 कोटी खर्च अपेक्षित असून तीन वर्षांच्या कालावधीत या इमारती बांधल्या जातील.