संयुक्त विकास करारावर (JDA) केलेल्या विकसनावर जीएसटी भरला नाही -केंद्रीय जीएसटी ची जयपुर मध्ये विकासकावर कारवाई

GST 4 YOU


नुकतीच केंद्रीय जीएसटी विभागाच्या जयपुर आयुक्तालयाच्या कर चूकवेगिरी विरोधी शाखेने जयपूर, राजस्थान येथे रिअल इस्टेट डेव्हलपर मेसर्स रिधिराज डेव्हलपर आणि उपासना बिल्डर, यांच्या कार्यालयात झडती आणि शोध मोहीम घेतली. शोध घेत असताना सदर विकासकांनी संयुक्त विकास करारावर (JDA) विकसनाचे काम केले परंतु मूळ जागा मालक/ सध्याचे सदस्य यांना दिलेल्या क्षेत्रांवर सुमारे 1.50 कोटी रुपयांचा जीएसटी भरला नसल्याचे निदर्शनास आल्याने केस दाखल करण्यात आली असून या कारवाई दरम्यानच विकासकांनी आपली चूक मान्य करून जीएसटी रक्कम
रुपये 34 लाख जमा केले.
केंद्रीय जीएसटी जयपूरने राजधानी जयपूरमध्ये असलेल्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर शोध मोहीम राबवली.