जीएसटी रेट बदलाबद्दल कोणतेही अनुमान टाळण्याची सीबीआयसी कडून विनंती-आगामी बैठकी पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला

GST 4 YOU
        केंद्रीय  अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळांने (सीबीआयसी) जीएसटी रेट बदलाबद्दल कोणतेही  अनुमान टाळावे अशी विनंती केली आहे.आज केलेल्या एक ट्विट मधे मंडळाने म्हटले आहे की या  संदर्भातील निर्णय केंद्र आणि राज्ये यांचा समावेश असलेल्या जीएसटी कौन्सिलद्वारे एकत्रितपणे घेतले जातात.
     या संदर्भातील आधारहीन अनुमानांमुळे निराधार अफवा निर्माण होतात आणि त्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होऊ शकते.
       सर्व संबंधितांना ३ आणि ४ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर होणाऱ्या अधिकृत घोषणांची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.