नोटबुक आणि एक्सरसाईझ बुक यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर आता 0% झाला आहे त्यामुळे त्यांच्या किमती किती कमी होतील अशी चर्चा आहे. कारण नोटबुक व तत्सम शालेय सामग्री तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावर 18 % कर लागू झाला आहे. व त्याचा आयटीसी मिळणार नाही. यामुळे प्रकाशक आणि ग्राहकांसाठी खर्चाचा बोजा निर्माण होताना दिसतो आहे. उत्पादकांसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट आता उपलब्ध नसल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती जीएसटी अंतर्गत इन्व्हर्टेड कर रचनेची ची एक उत्कृष्ट केस म्हणून पुढे आली आहे, ज्याची सरकारने पुढील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दखल घेणे अपेक्षित आहे.
पेपर आणि नोटबुकच्या दरात, विसंगती निदर्शनास आणल्याने. पुढील जीएसटी परिषद या वर विचार करू शकेल," एका माहितगार सुत्रांनी सांगितले .आगामी बैठकीत हा मुद्दा अजेंड्यावर असल्याचे सूचित करत सुत्रांनी सांगितले की विचाराधीन पर्यायांमध्ये कागदावरील जीएसटी कमी करणे किंवा पर्यायाने, इनपुट क्रेडिट लाभांसह नोटबुक 5 % स्लॅबमध्ये आणणे समाविष्ट आहे. जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक पुढील तीन महिन्यांत बोलावली जाण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी नोटबुक साठी वापरल्या जाणाऱ्या पेपरला 18% ऐवजी 0% टक्के कर स्लॅब मध्ये आणण्यात आले आहे हेही महत्त्वाचे आहे. सवलत अधिसूचना क्रमांक 10/2025- केंद्रीय कर ,दि. 17 /09/2025 च्या अनुक्रमांक 128 नुसार नुसार एक्सरसाइज बुक , नोटबुक साठी वापरल्या जाणाऱ्या कागदावरील कर 0% झाला आहे. त्यामुळे पेपर वरील कर वाढीचा परिणाम राहणार नाही.