शेवट पर्यंत रंगलेली ही क्विझ स्पर्धा पीएम श्री केंद्रीय विद्यालय, रेंज हिल इस्टेट यांनी जिंकली. या विद्यालयातर्फे अंतरिक्षा दत्ता, कुशन गुहा आणि श्रुती शुक्ला यांनी शाळेचे प्रतिनिधित्व केले. बिशप्स को-एड स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या स्पर्धेत इतिहास ते विज्ञान, क्रीडा ते चित्रपट आणि संगीत , खाद्य संस्कृती आदी विविध विषय समाविष्ट होते.
प्रधान मुख्य आयुक्त, जीएसटी व कस्टम्स, पुणे मयंक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमएनजीएल, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे संचालन क्विझ मास्टर दिनेश भोयर, जीएसटी आयुक्त (अपील्स) ,पुणे याचे समवेत जे. रामानंद, आणि बी.व्ही. हरीश कुमार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान आयुक्त, कस्टम्स, पुणे डी. अनिल यांचे समवेत अपर आयुक्त, कस्टम्स ,पुणे राहुल गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांना कस्टम्स च्या कार्य पद्धती बद्दल ही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कस्टम्स च्या अनुषंगाने विविध कृतींबद्दल जागरूक केले.