एन सी टी सी (नॅशनल कस्टम्स टार्गेटींग सेंटर) चे अप्पर संचालक सुहेल काझी यांचा मा.केंद्रीय अर्थ राज्य मंत्र्यांकडून विशेष सेवेबद्दल गौरव

GST 4 YOU
       भारतीय महसूल सेवेतील अधिकारी सुहेल काझी यांना केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ,नवी दिल्ली यांचे वतीने विशेष सेवेबद्दलचा गौरव पुरस्कार जागतिक सीमाशुल्क दिनाच्या निमित्ताने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.पंकज चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी केंद्रीय महसूल सचिव मा. अरविंद श्रीवास्तव, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष मा. विवेक चतुर्वेदी , तसेच सीबीआयसीचे सदस्य आदी प्रमुख उपस्थित होते.
      २००९ च्या भारतीय महसूल सेवेच्या अधिकारी असलेले सुहेल काझी हे सध्या राष्ट्रीय सीमाशुल्क लक्ष्यीकरण केंद्र, मुंबई (NCTC ) येथे अप्पर संचालक म्हणून कार्यरत आहेत.          
      एनसीटीसी सारख्या महत्वपूर्ण विभागात काम करताना सुहेल काझी यांनी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखालील, जोखीम- आधारित सीमाशुल्क तपासणीद्वारे कायदेशीर व्यापार सुलभ करण्यात आणि सीमा सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
    सहभागी सरकारी एजन्सीं मध्ये नियामक अनुपालनासाठी सुसंवाद साधून, व्यापार सुलभीकरण कार्यक्षमता सुधारून प्रगत आंतर-एजन्सी समन्वय साधण्याचे काम ही सुहेल काझी करत असून FSSAL ,ड्रग कंट्रोलर आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण यासारख्या एजन्सीं साठी लक्षणीय अशा सुविधा- सुधारणा साध्य करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
        अंमली पदार्थ विरोधी कायदे आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात त्यांचा मोठे योगदान असून त्यांच्या प्रयत्नांमुळे ८१.६५ किलो केटामाइन, ४३२ किलो मेथॅम्फेटामाइन , २०० किलोपेक्षा जास्त गांजा, ६२ ग्रॅम कोकेन आणि इतर विविध बंदी घातलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
       मूळचे अकलूज, जिल्हा सोलापूर चे असलेले सुहेल काझी यांनी यापूर्वी  केंद्रीय उत्पादन शुल्क, सांगली, पुणे, सीमा शुल्क, पुणे , केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभाग, पुणे या ठिकाणी आपली सेवा बजावली आहे.