दरम्यान कर दात्या ग्राहकाने पुरवठादाराला जीएसटी देऊनही त्याने तो जीएसटी शासनाकडे न भरल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना सोसावे लागणारे नुकसान व त्यावरील उपाय यावर बैठकीत काही चर्चा होईल याबद्दलही व्यावसायिक प्रतीक्षेत आहेत.
जीएसटी परिषदे ची 57 वी बैठक 12 सप्टेंबर 2026 रोजी प्रस्तावित -देशभरातील व्यावसायिकांचे लक्ष्य
August 30, 2026
जीएसटी परिषदेने जारी केलेल्या कार्यालयीन टिप्पणी नुसार 12 सप्टेंबर 2026 रोजी जीएसटी परिषदे ची 57 वी बैठक पार पडणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारमण भूषवणार आहेत. तसेच या बैठकीच्या आदल्या दिवशी 11 सप्टेंबर 2026 रोजी जीएसटी अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे देशभरातील लाखो व्यवसायांचे लक्ष लागून आहे. गेल्या बैठकीत म्हणजेच जीएसटी परिषदेने च्या 56 व्या बैठकीत जीएसटीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या होत्या. या बैठकीतही जीएसटी दरात काही घट होणार किंवा काय याची उत्सुकता देशभरातील व्यावसायिकांना लागून राहिली आहे .