जीएसटी करदात्यांनो 31 मार्च पर्यंत "ही" कामे करा!

GST 4 YOU

1.वस्तूंच्या पुरवठ्या करता एकूण वार्षिक उलाढाल ही आर्थिक वर्ष (2023-24) मध्ये रू. दीड कोटीच्या आत व सेवां करता उलाढाल रू. पन्नास लाखाच्या आत असल्यास करदाते कॉम्पोझिशन योजनेखाली सवलतीसाठी  अर्ज 31 मार्च पर्यंत करू शकतात.
2.आर्थिक  वर्ष (2023-24) मध्ये  एकूण वार्षिक उलाढाल ही रू.पाच कोटीच्यां आत असल्यास कर दाते त्रैमासिक  विवरणपत्र व मासिक कर भरणा (QRMP) योजनेखाली विकल्प घेऊ शकतात.
3.आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये  पहिल्यांदाच रू.पाच कोटीच्या वर एकूण वार्षिक उलाढाल झाली असेल तर अशा करदात्यांना एक एप्रिल पासून ई - इनवॉईस करणे  बंधनकारक आहे
4.जे करदाते -निर्यातदार जीएसटी न भरता वस्तू किंवा सेवांची निर्यात करू इच्छितात, त्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता लेटर ऑफ अंडरटेकिंग (LUT) साठी  अर्ज 31 मार्च पर्यंत करु शकतात.
5.करदात्यांनी आऊटवर्ड कर दायित्व जीएसटीआर- 01, जीएसटीआर-03 B  हे आपल्या अकाऊंटस जुळवून बघावे. कमी जास्त दुरुस्ती ही  मार्चच्या रिटर्नमध्ये करू शकतात.
तसेच इनपुट क्रेडिट जीएसटीआर-03 B, जीएसटीआर- 02 B आणि अकाऊंटस जुळवायला हवे आणि ज्या पुरवठादारांनी जीएसटीआर-01 दाखल केला नसेल, त्यांचा फॉलोअप घेऊ शकतात.
6.वर्षभरातील RCM चे अंदाज घेऊन काही कमी कर पेमेंट असेल तर योग्य ते पेमेंट करू शकतात.