जीएसटी करचोरी रोखण्यासाठी केंद्रीय जीएसटी आणि सर्व राज्यांच्या जीएसटी इन्वेस्टीगेशन शाखांचे प्रमुख अधिकाऱ्यांची एक दिवसीय बैठक

GST 4 YOU
  
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सोमवारी कर चोरी रोखण्यासाठी केंद्रीय जीएसटी तसेच सर्व राज्यांचे जीएसटी विभागांचे इन्वेस्टीगेशन प्रमुख यांच्या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन करत आहेत.

     केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जीएसटी चुकवेगिरी, बनावट इनव्हॉइसिंग, तसेच कर चुकवेगिरी रोखण्याच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे, कर वसूली मध्ये समन्वय, तंत्रज्ञान आणि डेटाचा उपयोग  आणि व्यवसाय  सुलभीकरण यावर विशेष चर्चा या बैठकीत होईल.

    ही बैठक कर प्रशासना समोरील सध्याच्या आव्हानांचे परीक्षण करेल तसेच  राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी यंत्रणांद्वारे वापर केलेल्या यशस्वी पद्धतींचा अभ्यास करेल. बनावट इनव्हॉइसिंगद्वारे जीएसटी कर चोरीवर चर्चा आणि त्याचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी प्रभावी पद्धतींची रणनीती करणे हे प्रामुख्याने अजेंडावर असेल, असे त्यात म्हटले आहे.
अर्थमंत्री सीतारामन या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन करतील आणि मुख्य भाषणही करतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री पंकज चौधरी हे देखील या परिषदेला उपस्थित राहतील..