1988 बॅच चे आयआरएस अधिकारी रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) अध्यक्ष पदी नियुक्ती

GST 4 YOU


केंद्र सरकारने रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) चे  अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून सध्याचे अध्यक्ष  नितीन गुप्ता यांचा कार्यकाळ आज ३० जून रोजी संपत आहे. 
केंद्र सरकारने 1988 बॅच चे आयआरएस  अधिकारी  रवी अग्रवाल यांची सीबीडीटी  अध्यक्ष म्हणून 01.07.2024 पासून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत म्हणजे 30.09.2024 पर्यंत नियुक्ती केली आहे. 
तसेच ते 30.09.2024  नंतर ही  30.06.2025 पर्यंत अध्यक्ष पदी राहतील.कराराच्या आधारावर भरती नियम शिथिल करून, पुनर्नियुक्त केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना लागू होणाऱ्या  अटी व शर्तींवर त्यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) हे  भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाचा एक भाग आहे. त्याच्यावर आयकर विभागाचे प्रशासन आणि भारतातील प्रत्यक्ष करांशी संबंधित धोरणे तयार करण्याची जबाबदारी आहे.