साधारण पणे दर महिन्याच्या १ तारखेला मागील महिन्यात देशात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन किती झाले, याची मासिक आकडेवारी शासनातर्फे जाहीर होते. मात्र आता ३ तारीख उलटून गेली तरी या बाबत प्रसिध्दी पत्रक जारी न झाल्याने अशी माहिती प्रसिद्ध न करण्याचा निर्णय झाला आहे किंवा काय याची चर्चा सुरू झाली आहे.
भारतात जीएसटी व्यवस्था लागू झाल्यापासून दर महिन्याला सरकारकडून कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली जात होती.
१ जुलै ला जीएसटी अंमलबजावणी आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील ७४ महिन्यांपासून प्रत्येक महिन्याला जीएसटीची संकलनाची आकडेवारी सरकारकडून जाहीर केली जात होती. मात्र, आता सरकारने यापुढे ही आकडेवारी जाहीर करायची नाही, असा निर्णय घेतला की काय असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ही माहिती प्रसिद्ध न करण्या साठी कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.