जीएसटी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील सर्व आंतरराज्य सीमांवरील चेक पोस्ट सरकारने बंद करावेत- वाहतूक दारांची मागणी

GST 4 YOU

वाहतूकदार संघटनांच्या लढ्यामुळे मध्य प्रदेश सरकारने 1 जुलैपासून सर्व आंतरराज्य सीमां वरील चेक पोस्ट बंद केले आहेत. आता महाराष्ट्र सरकारनेही चेक पोस्ट बंद करावेत, अशी मागणी  ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस ही देशभरातील वाहतूकदारांची शिखर संघटना व मध्य प्रदेश येथील वाहतूक संघटना यांच्या प्रयत्ना मुळे मध्य प्रदेश सरकारच्या परिवहन विभागामार्फत सुरू असलेले सर्व आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्ट बंद केले.
जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यांच्या सीमानाक्या वरील अनावश्यक चेक नाके बंद करण्यासाठी  ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस यांनी मागणी केली होती. या प्रयत्नानंतर आता १ जुलैपासून मध्य प्रदेश सरकारने विना अडथळा वाहतूकी साठी  गुजरात सरकारने अनुसरलेली आदर्श प्रणाली लागू करावी, अशी मागणी केली होती गुजरातमध्ये मालवाहतूकदारांनी माल भरल्यानंतर कर, दंडाचा ऑनलाइन भरणा केल्यास रस्त्यावर कोणतीही अडवणूक, तपासणी होत नाही. 
मात्र महाराष्ट्रासह  काही  इतर राज्यांनी परिवहन चेक पोस्ट सुरूच ठेवले आहेत. 
मध्य प्रदेश व गुजरात मॉडेल अवलंबून आता महाराष्ट्र सरकारनेही असे  चेक पोस्ट बंद करावेत, अशी मागणी  ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.