देशात एप्रिल २०२५ मध्ये एकूण जीएसटी संकलन विक्रमी रुपये २.३६ लाख कोटी- केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर दात्याना दिले धन्यवाद तर केंद्र , राज्य सरकारे /अधिकाऱ्यांचे केले कौतुक

GST 4 YOU

     एप्रिल २०२५ मध्ये एकूण जीएसटी संकलन २.३६ लाख कोटी झाले असून  ते एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या २.१० लाख कोटी रुपयांच्या एकूण संकलनापेक्षा १२.६% ने  जादा आहे असे  केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी समाज माध्यमा एक्स वर  सांगितले.
     आपल्या  पोस्ट  मध्ये  त्या पुढे म्हणतात की हे महसूल आकडे भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि सहकारी संघराज्यवादाची प्रभावीपण दर्शवितात.
       करदात्यांना मनापासून धन्यवाद देताना त्यांनी कर दाते यांचे  योगदान आणि त्यांचा जीएसटी प्रणाली वरील विश्वास हे देशाच्या प्रगतीला चालना देणारे असून यातून  विकसित भारत उभारण्यासाठी सामायिक वचनबद्धता दिसून येते.
भारताच्या जीएसटी रचनेत समान भागीदार राहिलेल्या सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचे आणि राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे समर्पित प्रयत्नांचे  मनापासून अभिनंदन करताना त्यांनी केंद्रीय  अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क  मंडळाच्या अधिनस्त केंद्रीय जीएसटीच्या च्या क्षेत्रीय  कार्यालये व अधिकाऱ्यांच्या  प्रामाणिक प्रयत्नांचे देखील कौतुक केले.