देशातील झालेल्या 'सवाँच्च' व्यवहारात मुंबईच्या वरळी सी फेस परिसरात दोन फ्लॅट चा तब्बल ६३९ कोटी रुपयांना व्यवहार झाला असून, हा देशातील आजवरचा गृहखरेदीचा सर्वोच्च व्यवहार ठरला आहे. एका औषध निर्मिती कंपनीचे अध्यक्ष यांनी या आलिशान घरांची खरेदी केली आहे.
वरळी सी फेस परिसरातील या ४० मजली इमारतीमध्ये त्यांनी या दोन दुमजली फ्लॅटची खरेदी केली आहे. इमारतीमध्ये ३२ ते ३५ मजल्यांवर त्यांचे हे फ्लॅट असून, त्यासाठी त्यांनी प्रतिचौरस फूट २ लाख ८३ हजार रुपये मोजले आहेत. या फ्लॅटचे एकत्रित आकारमान २२ हजार ७७२ चौरस फूट इतके आहे. या पलॅटच्या खरेदी व्यवहारांकरिता त्यांनी ३१.९५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क तर ३१.९५ कोटींचा जीएसटी भरला आहे.