प्राप्तिकर विभागाने वैद्यकीय व्यावसायिकावर टाकले छापे- मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त

GST 4 YOU
   राजस्थानमधील जोधपूरमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे .यात  डॉक्टरांच्या  ठिकाणांवर  छाप्या दरम्यान, विभागाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली.
   जोधपूर येथे शुक्रवारी (३० मे) रात्री आयकर विभागाने एका खाजगी रुग्णालय आणि  डॉक्टरच्या घरी झडती घेतली. सूत्रांनी सांगितले  की डॉक्टरच्या घरी कोट्यवधी रुपयांची रोकड असल्याची माहिती आयकर विभागाच्या तपास शाखेला मिळाली होती.  त्यानंतर येथे कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.आयकर विभागाच्या पथकाने रोख मोजण्याचे यंत्र मागवले आहे 
      तपासात असे दिसून आले आहे की कथित हॉस्पिटल विक्री चा व्यवहार सुमारे ७ कोटी रुपयांना झाला होता . यापैकी ४ कोटी रुपये बेकायदेशीरपणे रोख स्वरूपात दिले  होते , तर रजिस्ट्रीमध्ये व्यवहाराची रक्कम खूपच कमी दाखवण्यात आली होती. आयकर अधिकाऱ्यांच्या मते , व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि रोख रकमेची तपासणी सुरू आहे. घटनास्थळी पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
    सध्या रोख रकमेची अचूक मोजणी सुरू आहे आणि विभागाची टीम संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतरच रोख रकमेची खरी रक्कम निश्चित होईल.