देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनी पैकी एक इन्फोसिस लिमिटेड ला केंद्रीय जीएसटी कर प्रशासना कडून मोठा दिलासा मिळाला असून डायरेक्टरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंस (डीजीजीआय) ने ३२,४०३ कोटी रुपयांच्या मोठ्या कर मागणीशी संबंधित कर प्रकरण अधिकृतपणे बंद केले आहे. हा खटला इन्फोसिस च्या परदेशी शाखांमधून आयात केलेल्या सेवांसाठी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) न भरल्याच्या कथित प्रकरणाशी संबंधित होता.
हे प्रकरण जुलै २०२४ असून डीजीजीआयने जुलै २०१७ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी इन्फोसिसला पूर्व-कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये आयजीएसटी रिव्हर्स चार्ज तरतुदींचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि ३२,४०३ कोटी रुपयांच्या संभाव्य दायित्वाचा उल्लेख करण्यात आला होता. प्रतिसादात, इन्फोसिसने आवश्यक स्पष्टीकरणे आणि कागदपत्रे सादर केली.
इन्फोसिस लिमिटेड कंपनीने आता नियामक घोषणेद्वारे पुष्टी केली आहे की हा विषय संपला असून डीजीजीआयकडून या संबंधी त्यांना संदेश मिळाल्याने, हे प्रकरण बंद झाले आहे.