केंद्रीय जीएसटी विभागाकडून देश व्यापी ' जीएसटी पंधरावडा' सुरू -जीएसटी अंमलबजावणीच्या आठ वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम

GST 4 YOU
      केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC)ने सोमवार पासून देशव्यापी ' जीएसटी पंधरावडा' सुरू केला, जो १ जुलै रोजी होणाऱ्या जीएसटी दिनाच्या समारंभाचा भाग असेल . व ३० जूनपर्यंत सुरू राहील.
        दोन आठवड्यांच्या या मोहिमेचा उद्देश वस्तू आणि सेवा कर  बद्दल कर दाते आणि नागरिक यांच्यात  अधिक  जागरूकता पसरवणे आणि करदात्यांना त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात मदत करणे आहे.
          मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी देशभरातील सर्व केंद्रीय जीएसटी आयुक्तालयात  व विभागीय कार्यालयामध्ये हेल्पडेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
        हा उपक्रम भारतातील जीएसटी अंमलबजावणीला पूर्ण होत असलेल्या आठ वर्षपूर्तीच्या निमित्ताने  आहे. जीएसटी   ही एक महत्त्वाची सुधारणा आहे , ज्यामुळे २०१७ मध्ये देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीला एकत्रित तर  केले,  मात्र केवळ कर सुधारणा पुरते मर्यादित न राहता व्यवसाय सुधारणा यांनाही फार मोठा हातभार लावल्याचे स्पष्ट झाले आहे.