सध्याच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वाहनांची विक्री आणि चौकशीत अचानक घट झाल्यामुळे, ऑटोमोबाईल उद्योगाने सरकारला नवीन जीएसटी दरांची जलद अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. सप्टेंबरच्या पासून उत्सव हंगाम सुरू होण्यापूर्वी ती लागू करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दुसऱ्या पर्वातील जीएसटी सुधारणा आणि जीएसटी दरात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर, खरेदीदारांनी लहान कार आणि दुचाकी वाहने ८-१०% पर्यंत स्वस्त होण्याची अपेक्षा बाळगून त्यांची खरेदी पुढे ढकलण्यास सुरुवात केली आहे .
वाहन उद्योग क्षेत्रातील माहितगारांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलची बैठक तीन व चार सप्टेंबरला होणार असल्याने त्याकडे उद्योग जगतातील लोकांच्या बरोबरच ग्राहकांचेही लक्ष लागून राहिले आहे.
सध्या सर्व प्रकारची प्रवासी वाहतुकीची वाहने यावर 28% किंवा त्याहून अधिक जीएसटीचा दर आहे. त्यात किमान दहा टक्के घट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.