अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अधिकाऱ्यांना जीएसटी करदात्यांकडून अनावश्यक माहिती मागवून अनुपालनाचे ओझे लादण्याविरुद्ध इशारा दिला आणि त्याऐवजी अधिकाऱ्यांनी अनुपालनासाठी तंत्रज्ञान आणि जोखीम-आधारित मानके यांचा वापर करावा असे सांगितले.
गाझियाबादमधील नवीन केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) भवनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, मा. सीतारामन म्हणाल्या की अधिकाऱ्यांनी कर प्रशासनात अडथळा बनून राहू नये. कर कायद्याची अंमलबजावणी ही संशयावर आधारित नसून बुद्धिमान आणि लक्ष्या वर आधारित असावी. जीएसटी क्षेत्रातील कोणीही करदात्यावर अधिक भार टाकावा असे आम्हाला वाटत नाही," असे त्या म्हणाल्या.
त्यांनी असे म्हटले की, करदात्यांकडून अनुपालनासाठी जास्तीची कागदपत्रे मागण्यापेक्षा , तंत्रज्ञानाचा वापर करून परिस्थितीची योग्य चौकशी केली पाहिजे.
"प्रत्येकाकडे संशयाने पाहू नका. जुनी मानसिकता बाळगू नका, २०४७ पर्यंत देश विकसित होण्यासाठी एकत्र काम करण्याची तीव्र गरज पहा. आपल्याकडे विकास करण्यासाठी आणखी जादा वेळ नाही, असे मा. निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या.
त्यांनी क्षेत्रीय जीएसटी अधिकाऱ्यांना तक्रार निवारणासाठी समर्पित पथके तयार करण्यास आणि करदात्यांना येणाऱ्या वारंवार येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले.
"करदात्यांमधील चुकीचे लोक ओळखले पाहिजेत, परंतु कायद्याची अंमलबजावणी होताना , प्रामाणिक करदात्यांना त्रास होणार नाही, हे लक्षात घेऊन काम करण्याच्या सूचना केल्या.