सप्टेंबर २०२५ साठी GSTR-३B दाखल करण्याची अंतिम तारीख आता २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत

GST 4 YOU
.          भारत सरकार च्या अर्थ मंत्रालया अंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ,  नवी दिल्ली (CBIC) ने सप्टेंबर २०२५ साठी GSTR-३B दाखल करण्याची अंतिम तारीख अधिकृतपणे २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली आहे . याची अधिसूचना क्रमांक १७/२०२५-केंद्रीय कर, दिनांक १८.१०.२०२५ रोजी जारी करण्यात आली आहे.
          कर सल्लागार यांच्यावर सध्या असलेल्या आयकर ऑडिट कामाचा भार आणि देशातील सर्वात महत्त्वाचा सण दिवाळी उत्सवाचे  दिवस तसेच काही राज्यात आलेली पूर स्थिती आदी विषय करदाते , कर सल्लागार यांनी प्रशासनासमोर मांडले होते.
       करदात्यांना आणि कर व्यावसायिकांना दिलासा देताना वेळेवर आणि विचारशील अशा या जीएसटी परिषदेच्या या निर्णयाबद्दल व्यावसायिक जगतातून समाधान व्यक्त होत आहे.