बडे सराफ व्यापारी, रिअल इस्टेट, कायदा क्षेत्रातील मंडळीच्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि घरांवर आयकर विभागाकडून कारवाई - कागदपत्रांची तपासणी सुरू

GST 4 YOU
        बडे सराफ व्यापारी, रिअल इस्टेट, कायदा क्षेत्रातील मंडळीच्या फर्म आणि घरांवर सोलापूरात आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या असून कारवाई दरम्यान  प्राप्त कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समजली. व्यवहारातील अनियमितेसंबंधी ही तपासणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.                        
    बुधवारी सकाळपासून पुरेशा पोलीस बंदोबस्तामध्ये  सुरू झालेल्या या मोहिमेत पुणे,  मुंबई, सोलापूर, कोल्हापूरसह ,दादरा नगर हवेली, दीवदमण येथील वाहने वापरण्यात आली.आयकर विभागाने या तपासणी मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी ,कर्मचारी तैनात केले असून, या मोहिमेमध्ये ३५ हून अधिक वाहनांमध्ये १०० च्या आसपास अधिकारी, कर्मचारी अशी यंत्रणा दिसून आली. काल पहाटेपासूनच या प्रक्रियेस सुरुवात झाली. यामध्ये मधला मारुती परिसरातील दोन, व्हीआयपी रोडवरील एक, रिअल इस्टेटमधील गांधीनगर भागातील दोघांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 
     पथकाकडून एकाचवेळी सराफ , त्यांची निवासस्थाने, बांधकामांच्या साईट, इतर व्यवसायिकक यांच्या कार्यालयांवर धाडी टाकून तपासणी मोहीम राबवली गेली.
     सदर ठिकाणी  तपासणी सुरू असून, यामध्ये आर्थिक व्यवहारासंबंधीची कागदपत्रे तपासली जाऊन यातून कर भरण्यासंबंधी काही अनियमितता आढळल्यास त्यांची पूर्तता  करून घेतली जाईल, असे सूत्रांकडून समजते.