३६ तासांहून अधिक काळ आयकर विभागाकडून तपासणी- सराफी दुकाने, बिल्डर,वकील यांच्या कार्यालयात कागदपत्रे, दस्तावेज यांची दुसऱ्या दिवशीही कसून छाननी

GST 4 YOU
सोलापूर शहरातील दोन सराफ , एक वकील तसेच बांधकाम व्यावसायिकावर बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने सुरू केलेली कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही संबंधितांच्या दुकाने, कार्यालयांमध्ये सुरू होती. तब्बल ३६ तासांहून अधिक काळ लोटूनही कसून चौकशी होत असतानाच  हा छापा नेमका कोणत्या आर्थिक अनियमिततेसाठी पडला, याविषयी मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नव्हती.
        सोलापुरातील बड्या व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर पडलेल्या आयकर विभागाच्या छाप्याने शहर व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून व्यावसायिक, कर सल्लागार यांच्यात मोठी चर्चा होताना दिसते आहे. आयकर विभागाच्या या छाप्यात  आतापर्यंत तकोणतीही अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिली गेली नाही. त्यामुळे याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या हाती नेमके काय लागले याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.