अन्यथा जीएसटी नोंदणी होऊ शकते निलंबित..... जीएसटी नियम १०अ नुसार बँक खात्याचे तपशील अद्ययावत करण्याचे जीएसटी नेटवर्कच्या सूचना

GST 4 YOU
                    जीएसटी नियम १०अ नुसार, करदात्यांनी (टीसीएस, टीडीएस किंवा नियम १६ खालील विभागाने स्वतःहून नोंदणीकृत केलेले करदाते वगळता) नोंदणी मंजूर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत किंवा जीएसटीआर-१ किंवा आयएफएफमध्ये बाह्य पुरवठ्याची माहिती दाखल करण्यापूर्वी, जे आधी असेल, त्यापूर्वी त्यांच्या बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. 
        नियम १०अ मधील बदल लवकरच जीएसटी पोर्टलवर लागू केले जातील. म्हणून, ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत बँक खात्याची माहिती दिली नाही,  त्यांची जीएसटी नोंदणी निलंबित होऊन व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये व्यत्यय येऊ शकतो ,ते टाळावे म्हणून बँक खात्याचा तपशील लवकरात लवकर अदयावत करण्याचा सल्ला जीएसटी नेटवर्क च्या वतीने देण्यात येत आहे.
          बँक खात्याचे तपशील नॉन-कोर दुरुस्तीद्वारे पुढील प्रमाणे नेव्हिगेट करून जोडले जाऊ शकतात:       Services > Registration > Amendment of Registration Non-Core Fields.