अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या कार्यालयीन आदेश क्रमांक ०३/ २०२५ नुसार, जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचे सदस्य देशभरातील त्यांच्या संबंधित खंडपीठांमध्ये नियुक्त केले आहेत आणि त्यांना २१ जानेवारी २०२६ रोजी पदांवर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकृत वाटप आदेशानुसार जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाच्या चेन्नई खंडपीठासाठी, शेख खादर रहमान हे तांत्रिक सदस्य (केंद्र) म्हणून पदावर आहेत. , तर प्रवीण कुमार जैन आणि गिरीश कुमार व्यास हे न्यायिक सदस्य म्हणून आहेत.
महाराष्ट्रातील जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठासाठी, निर्मल कुमार सोरेन हे तांत्रिक सदस्य (केंद्र) म्हणून तर श्रीधर महादेव भोसले हे न्यायिक सदस्य, तर मुंबई खंडपीठासाठी, डेविड थॉमस अलवारिस हे तांत्रिक सदस्य (राज्य) म्हणून तर धर्मेंद्र कुमार राणा हे न्यायिक सदस्य म्हणून नियुक्त केले आहेत तर नागपूर खंडपीठासाठी, सुनील कुमार दास हे तांत्रिक सदस्य (केंद्र) म्हणून तर राजीव पुरुषोत्तम पांडे हे न्यायिक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.