ई-कॉमर्स कंपनी मार्केटप्लेस मीशो लिमिटेडला आयकर विभागाकडून रु १,४९९.७३ कोटींची कर मागणी - कंपनीने विभागाच्या मागणीशी दर्शवली असहमती

GST 4 YOU
बेंगळुरूस्थित ई-कॉमर्स मार्केटप्लेस मीशो लिमिटेड (पूर्वी मीशो प्रायव्हेट लिमिटेड आणि फॅशनियर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ) यांना आयकर कायदा, १९६१ च्या कलम १४३(३) अंतर्गत एक कर निर्धारण आदेशामुळे व्याजासह ₹१,४९९.७३ कोटींची कर मागणी करण्यात आली आहे. 
५ मार्च २०२६ रोजी आयकर विभागाच्या मूल्यांकन युनिटने जारी केलेल्या आदेशात कंपनीच्या घोषित उत्पन्नात भर आणि समायोजन केल्यानंतर १,४९९.७३ कोटी रुपयांची (व्याजासह) मागणी करण्यात आली आहे. कंपनीला ६ मार्च २०२६ रोजी आदेश आणि सूचना मिळाली.
    मीशोने खुलासा केला आहे की  ते सध्या सदर आदेशाचे मूल्यांकन करत असून कर अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणांशी ते सहमत नाहीत. तसेच कंपनी अपीलाद्वारे या आदेशाला आव्हान देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.