जीएसटी आणि शिक्षण विभागाचा संयुक्त छापा- शाळा आणि पुस्तक दुकान यांच्यातील साटेलोटे उघड

GST 4 YOU
  जीएसटी आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त पथकाने बुलंद शहर (उत्तर प्रदेश)अनुसारा रोडवरील बुकमार्टवर छापा टाकला. बऱ्याच काळापासून येत असलेल्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
      पालकांनी आणि काही शाळा प्रशासकांनी यापूर्वी असा आरोप केला आहे की, विद्यार्थ्यांवर ठराविक दुकानांमधून अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जातो. त्यांच्या मते, येथे ' नफे खोरी' खेळ सुरू आहे.
      एका माहीतगाराने सांगितले की, दुकानात बिलिंग आणि स्टॉकमध्ये अनेकदा तफावत असायची. काही विक्री व्यवहार दुसऱ्यांच्या नावावर नोंदवले जात होते, ज्यामुळे कर चुकवेगिरीची शक्यता निर्माण झाली होती.
       छाप्यादरम्यान, अधिकाऱ्यांना एका नोंदणीकृत फर्ममार्फत पुस्तकांची विक्री होत असल्याचे दर्शवणारी कागदपत्रे आढळली, त्यामुळे करचुकवेगिरी आणि फसवणुकीच्या व्यवहारांचा संशय बळावला.पथकाने घटनास्थळावरून खरेदी-विक्रीच्या नोंदी, स्टॉक स्टेटमेंट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. 
     जीएसटी अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात काही संशयास्पद व्यवहार आणि नोंदींमध्ये विसंगती आढळून आली आहे. सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे.अभ्यासक्रमांच्या नावाखाली पुस्तक विक्री पोटी कमिशन दिले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मान्य केले.    अधिकाऱ्याने सांगितले की, शाळा आणि दुकान यांच्यात कोणत्याही प्रकारची साटेलोटे असल्याचा पुरावा आढळल्यास, संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल