प्राप्तिकर पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त विवेक वाडेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 'या मोहिमेचे उद्घाटन १५ मे रोजी गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर येथे होणार आहे. करदाते, कर सल्लागार, उद्योजक अशा सर्व संबंधित घटकांसाठी आहे. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजिका लीला पूनावाला, 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर'चे (एमसीसीआयए) प्रदीप भार्गव यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुणे आर्थिक क्षेत्रांना चालना देणारे शहर असल्याने पुण्यातून ही मोहीम सुरू केली आहे. प्राप्तिकर पुणे विभागात एकूण २३ जिल्ह्यांतही ही मोहीम राबविली जाणार आहे.' नवा प्राप्तिकर कायदा समजण्यासाठी 'करसाथी' हा चॅटबॉट तयार केला असून, तो '२४x७' सातही दिवस' सुरू असेल. वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या (एफएक्यू) उत्तरांसाठी 'करसेतू' ही सेवा मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्राप्तिकर सेवा केंद्रातही ही सुविधा दिली जाणार आहे. नव्या कायद्याची मराठी भाषेतील पत्रके, पुस्तके तयार करण्यात आली आहेत. या पुस्तक, पत्रकांचे प्रकाशन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. पत्रकांवर 'क्यूआर' कोड असणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले.
आयकर विभागाने सुरू केली कर दाता जागरूकता मोहीम- 'प्रारंभ २०२६' चे १५ मे रोजी पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन
May 13, 2026
देशात एक एप्रिलपासून नवा प्राप्तिकर कायदा लागू झाला आहे. नव्या कायद्यात कर प्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक करण्यात आली आहे. हा नवा कायदा अधिकाधिक करदात्यांना समजावा, याकरिता 'प्रारंभ २०२६' ही जागरूकता मोहीम प्राप्तिकर पुणे विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.