आयातशुल्क वाढी नंतर सोन्याच्या संभाव्य तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय) तसेच सीमाशुल्क अधिकारी यांची करडी नजर

GST 4 YOU
                                        
        सोने-चांदी व प्लॅटिनम यांची आयात कमी व्हावी, परकीय चलन वाचावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून मौल्यवान धातूंवरील आयातशुल्क मोठ्या प्रमाणावर बुधवारी वाढवण्यात आले. त्यामुळे सोन्याची अवैध आयात वाढण्याची शक्यता गृहीत धरून आता सोन्याच्या संभाव्य तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय) तसेच सीमाशुल्क अधिकारी करडी नजर ठेवणार आहेत.
    आंतरराष्ट्रीय सीमांवर पाळत aani सतर्कता वाढवली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी सोन्यावरील सीमाशुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
'सोन्याच्या तस्करीची साखळी तोडणे आणि तस्करी करणाऱ्या टोळ्या; तसेच सीमापार कार्यरत बेकायदा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना अडवणे हा उद्देश आहे. सोन्याच्या तस्करीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी गुप्तचर माहितीवर आधारित पाळत आणि अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल,' असे एका अधिकाऱ्याने सांगितले.  कर अधिकारी जमीन  आणि  किनारपट्टी मार्गांवरील घुसखोरी, वितरण केंद्रे म्हणून काम करणारे देशांतर्गत दलाल, संघटित वाहक नेटवर्क आणि परदेशी  टोळ्यांवर देखरेख वाढवून  या टोळ्यांना सोन्याच्या बाजारपेठेचा गैरफायदा घेण्यापासून लोकांचे प्रयत्न करतील.