वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरण (GSTAT) समोर अपील दाखल करण्याची अंतिम मुदत आता 31.07.2026 पर्यंत

GST 4 YOU
         सरकारने वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरण (GSTAT) समोर  अपील दाखल करण्याची अंतिम मुदत 31.07.2026 पर्यंत वाढवली आहे.
         दिनांक 17.09.2025 च्या पूर्वीच्या अधिसूचनेद्वारे, सरकारने GSTAT समोर अपील दाखल करण्याची अंतिम तारीख 30.06.2026 अशी अधिसूचित केली होती.
        जीएसटीएटी पोर्टलवर अपील दाखल करण्याच्या गर्दी मुळे अलीकडे निर्माण झालेल्या विविध तांत्रिक अडचणी नमूद करणाऱ्या हितधारकांच्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने अंतिम मुदत वाढवली आहे.        
    प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की सप्टेंबर २०२५ मध्येच अंतिम मुदत खूप आधी अधिसूचित करण्यात आली असली तरी,  केवळ गेल्या १५ दिवसांत ३०,००० अपील दाखल झाली असून, एका दिवसात सर्वाधिक ५,५०० अपील दाखल झाली आहेत.
   सरकारने करदात्यांना असा सल्ला दिला आहे की त्यांनी अपील दाखल करण्याचे नियोजन खूप आधीच करावे आणि अंतिम मुदतीपर्यंत वाट पाहू नये.