राजस्थानच्या राज्य वाणिज्य कर विभागाने कर चुकवेगिरीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून, जयपूर येथील मुख्यालयाच्या अंमलबजावणी शाखे ने मे. प्रेम ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्याशी संबंधित इतर चार कंपन्यांच्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली.
समूहाच्या कंपन्या मेंदी पावडर, मेंदी कोन, हेअर कलर आणि इतर सौंदर्य उत्पादनांचे उत्पादन व विक्री करतात. या कंपन्या सोजत आणि पाली येथून स्थानिक पातळीवर मेंदी खरेदी करतात, विविध उत्पादने तयार करतात आणि त्यांचा पुरवठा विविध राज्यांमध्ये करतात.
राजस्थान जीएसटी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांनी वस्तूंचा प्रत्यक्ष पुरवठा न घेता, त्यांच्या कौटुंबिक समूहाशी संबंधित विविध कंपन्यांकडून अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवून गेल्या काही वर्षांपासून सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसुली नुकसानीस कारणीभूत ठरल्या आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार असा अंदाज वर्तवण्यात आला की, सदर कंपन्यांनी गेल्या ५ वर्षांत सुमारे ३५ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केली आहे.