आर्थिक वर्ष २०२५-२६ म्हणजेच करनिर्धारण वर्ष २०२६-२७ साठी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची आज, शुक्रवार (३१ जुलै) ही अंतिम मुदत आहे.माहिती नुसार आतापर्यंत पाच कोटींहून अधिक करदात्यांनी 'आयटीआर' दाखल केला आहे. अंतिम दिवस असल्याने प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
'आयटीआर' भरल्यानंतर करपरतावा (रिफंड) वेळेत मिळण्यासाठी करपरतावा ज्या बँक खात्यात जमा व्हावा, ते खाते प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर 'व्हॅलिडेट' करणे आवश्यक आहे. केवळ 'व्हॅलिडेट' केलेल्या खात्यातच परतावा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. प्रमाणपत्रे तपासा
आयटीआर दाखल करण्यापूर्वी 'फॉर्म २६एएस', वार्षिक माहिती विवरण (एआयएस), 'टीडीएस प्रमाणपत्र' आणि 'फॉर्म-१६' यांतील माहितीची पडताळणी करावी. 'आयटीआर' मधील तपशील आणि प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध माहितीत तफावत असल्यास परताव्याची प्रक्रिया विलंबित होऊ शकते.
आवश्यक 'पॅन' आणि आधार क्रमांक परस्पर जोडलेले असल्याची खात्री करावी. दोन्ही क्रमांक जोडलेले नसल्यास करपरतावा मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
कोणताही कर थकीत असल्यास किंवा अन्य कर देय राहिल्यास त्याची माहिती 'आयटीआर' मध्ये नमूद करणे आवश्यक आहे. अशा थकबाकीची रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या 'कलम २४५ नुसार करपरताव्यातून समायोजित केली जाऊ शकते.