खते, पेस्टिसाइडच्या व्यायवसायिकावर जीएसटी विभागाचा छापा! मोठी कर चोरी उघड !!

GST 4 YOU
            जीएसटी विभागाच्या विशेष गुप्तचर विभागाच्या (एसआयबी) पथकाने  उत्तर प्रदेशातील मेरठ  जवळील हसनपूर गावातील सिद्धांत पेस्टिसाइड्स प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला.  जीएसटी अधिकाऱ्यांनी आयटीसी  (इनपुट टॅक्स क्रेडिट) रिटर्नमध्ये कथित अनियमितता असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
 पथकाने स्टॉक, खरेदी-विक्रीची बिले, जीएसटी रेकॉर्ड आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली, तसेच संपूर्ण परिसराचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. या कारवाईदरम्यान पोलीस तैनात करण्यात आले होते.
      जीएसटी टीमच्या धाडीची माहिती मिळताच, आजूबाजूच्या बाजारपेठांमध्ये घबराट पसरली आणि अनेक व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली दुकाने बंद केली.
  अधिकारी म्हणाले की, तपासानंतर विभाग सविस्तर माहिती देईल. करदात्याने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.