जीएसटी अधिकाऱ्यांचे अटक करण्याचे अधिकार काढून घेतले,मात्र फौजदारी खटले सुरूच राहतील: जीएसटी परिषदेचा महत्त्वाचा निर्णय

GST 4 YOU
         आज  8 ऑक्टोबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेतील महत्त्वपूर्ण निर्णयानुसार कर अंमलबजावणी प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जीएसटी परिषदेने जीएसटी अधिकाऱ्यांचे अटक करण्याचे अधिकार काढून टाकण्याची शिफारस केली आहे. तथापि, अर्थमंत्र्यांनी मा. निर्मला सीतारामन यांनी  स्पष्ट केले की जीएसटी कायद्यांतर्गत गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये फौजदारी खटला सुरूच राहील.
        बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान, 
प्रश्नाला उत्तर देताना मा. सीतारामन यांनी स्पष्ट केले की, या निर्णयामुळे केवळ कर अधिकाऱ्यांकडून अटकेचे अधिकार काढून घेतले जातील .मात्र गुन्हेगारी सिद्ध झाल्यास खटला चालवण्यास प्रतिबंध होणार  नाही. तर परिषदेने जीएसटी अंतर्गत खटला दाखल करण्यासाठीची आर्थिक मर्यादा १ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. या प्रस्तावित बदलाचा उद्देश कमी रकमेच्या करांशी संबंधित फौजदारी कारवाईला आळा घालणे हा आहे.
     मा.अर्थमंत्र्यांचे  हे  स्पष्टीकरण खूप महत्त्वाचे आहे, कारण ते अटक करण्याचे अधिकार काढून घेणे आणि जीएसटी अंतर्गत फौजदारी प्रक्रिया यांमधील फरक स्पष्ट करते. गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींवर लागू कायद्यानुसार खटला चालवला जाऊ शकतो.
        मा. अर्थमंत्र्यांनी अशीही घोषणा केली की, बैठकीत शिफारस करण्यात आलेल्या जीएसटी प्रक्रियेसंबंधित सुधारणा १ एप्रिल २०२७ पासून लागू केल्या जातील.